Shivswaraj Din

M.A. RANGOONWALA DENTAL COLLEGE & RESEARCH CENTER*

राष्ट्रीय सेवा योजना
शिवस्वराज्य दिन
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत दिनांक ६ जून २०२२ रोजी शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य आणि सुराज्य संकल्पनेस उजाळा दिला
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भाषण केले.
या भाषणांमध्ये शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि सुराज्य, सर्व धर्म समभाव, महिलांबद्दल आदर, व्यवस्थापन त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व, दूरदृष्टी पणा, शिवराज्याभिषेक इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले मत मांडले.
श्री महादेव जाधव यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधरित पोवाडे सादर केले.
या कार्यक्रमात दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग दिला.
या कार्यक्रमाचे पमुख् पाहुणे डेप्युटी कमिशनर -श्रीमती आशा राउत, सहाय्यक आरोग्य अधिकारी-डॉ. केतकी घाटगे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्य आपले मनोगत व्यक्त केले.
त्यांनी शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभाव व त्यांच्या रामराज्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

त्यानंतर रजिस्टर आर.ए.शेख सरांनी शिवाजी महाराजांच्या अजोड कार्याची महती पटवून दिली.
त्याच प्रमाणे आमचे आदरणीय अध्यक्ष डॉ पि.ए.इनामदार सर ,आमचे उपप्राचार्य डॉ.विवेक हेगडे सर हे कार्यक्रमाला उपस्थित होते .

या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य डॉ. रमनदीप् दुग्गल यांचे मार्गदर्शन लाभले.

Photos Drive Link:- DRIVE